अनंत राधिकाच्या लग्नात देशमुखांच्या सुनेचा मराठमोळा थाट!

सध्या अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नात अनेक सेलिब्रिटी पोहचले आहेत.

या लग्नात मराठमोळं जोडपं रितेश आणि जिनिलिया देखील पोहचलं आहे.

या लोकप्रिय जोडप्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

जिनिलिया आणि रितेश मराठमोळ्या पेहरावात या लग्नात पोहचले आहेत.

जिनिलियाने ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी, त्यावर गोल्डन रंगाची शाल, चंद्रकोर, नाकात नथ असा पारंपरिक मराठी लूक केला होता.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

तर रितेशनेही कुर्ता त्यावर जॅकेट आणि खाली धोती असा लूक केला होता.

देशमुख जोडप्याच्या या लूकची चर्चा होतेय.

जिनिलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.