पांडुरंगाच्या कानात मासोळ्या का असतात?

17 जुलै रोजी सर्वत्र आषाढी एकादशीच्या दिवस साजरा केला जाणार आहे.

यानिमित्ताने वारकरी आणि भक्तगण पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाच्या चरणी लिन होतात.

विठूरायाच तेजस्वी रूप पाहून भक्तगण भरून पावतात.

पण अनेकांना विठ्ठलाच्या कानात मकर म्हणजेच माशांना स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो.

खरंतर विठ्ठलाच्या कानात मासे नसून ती माशांच्या आकाराची कुंडले आहेत.

एकदा एक कोळी पांडुरंगाला भेटून त्यांच्या करता उपहार म्हणून मासे घेऊन आला होता.

मात्र इतर लोक त्यांना पांडुरंगाच्या जवळ जाऊन देत नव्हते.

लोक त्याला 'पांडुरंग देव आहेत, तू त्यांना मासे कसे देतोस पाप लागेल तुला आणि आम्हाला सुद्धा' असे म्हणाले.

तेव्हा विठू माउली त्यांना म्हणाली, ' तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. उलट त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याच्याकडे पाहा.'

पुढे माउली म्हणाली, 'मला तुम्ही जे भक्तिभावाने द्याल ते मी आदराने आणि मनापासून स्वीकारेन. मी ते काहीही असो. कारण मी ही सृष्टी चालवलीये त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी सुद्धा आहेत'.

विठूमाऊलीने त्या कोळ्याच्या हातून दोन मासे घेतले आणि सर्वांना समजावं की सर्व समान आहेत म्हणून त्यांनी आपल्या कानात कुंडले म्हणून ते घालून घेतले.

एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख, "मकर कुंडले तळपती श्रवणी" अर्थात कानात माशांच्या आकाराचे कुंडले आहेत.

(इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. न्यूज18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा