तुम्ही फळं चुकीच्या पद्धतीने तर खात नाही ना? 

फळांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळत असेल तरी त्याचे सेवन हे ठराविक वेळेतच करावे.

फळांचे सेवन चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

जेवणापूर्वी किंवा भरपूर जेवल्यावर फळांचे सेवन केल्याने पोटाशी निगडित समस्या होऊ शकते.

अन्न पचायला जितका वेळ लागतो तेवढाच वेळ फळांना पचण्यासाठी जातो. यामुळे, ते बराच वेळ पोटात राहतात आणि पाचक रसांमुळे जास्त शिजतात ज्यामुळे किण्वन सुरू होते.

खाल्लेली फळ न पचल्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ, अपचन, होऊ शकते. त्यामुळे नेहमी जेवणाआधी किंवा जेवणानंतर फळ खाण्यापेक्षा इतर वेळी फळे खावीत.

तुम्ही फळ जेवणाच्या एक तास आधी किंवा जेवणाच्या 2 तास नंतर करावे.

जेवल्यानंतर किंवा जेवणासोबत फळाचे सेवन करू नये.

फळांना दूध किंवा दही सोबत मिक्स करून खाऊ नये.

फळांच्या रसाचे सेवन तेव्हाच करा ज्यावेळी तुम्हाला पचण्यासंबंधित समस्या जाणवत असतील.

रात्री उशिरा फळाचे सेवन करू नका

दुधात केवळ पिकलेली आणि शुद्ध फळे मिसळून त्यांचे सेवन करायला हवे.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)