हार्दिक पंड्याने नताशापूर्वी या सौंदर्यवतींना केलंय डेट

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा हे दोघे विभक्त झाले आहेत.

अखेर हार्दिक आणि नताशा दोघांनी लग्नाच्या 4 वर्षांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हार्दिकने नताशा सोबत मे 2020 मध्ये लग्न केले होते. नताशा लग्नाआधी गरोदर होती तिने जुलै महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला ज्याचे नाव अगस्थ्य ठेवण्यात आले.

नताशाशी लग्न करण्यापूर्वी हार्दिकचं नाव हे 4 सौंदर्यवतींसोबत जोडलं गेलं.

अभिनेत्री ईशा गुप्ता हीच नाव हार्दिक पंड्या सोबत जोडण्यात आलं होत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

मात्र ईशा आणि हार्दिक यांनी याबाबत कधीच कबुली दिली नाही.

हार्दिकच नाव विश्वसुंदरी आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबतही जोडलं गेलं होत. दोघांच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती.

हार्दिकने मॉडेल आयेशा शर्मा हिला बराचकाळ डेट केलं होत.

मात्र दोघांनी आपआपल्या करिअवर लक्ष्य केंद्रित करण्याच्या उद्देशाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असे बोलले जाते.

हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री एली अवराम हे दोघेही अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

एली अवरामने हार्दिकच्या कुटुंबाशी सुद्धा जवळीक वाढवली होती. मात्र त्यानंतर दोघे वेगळे झाले. 

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा