घराबाहेर हे Liquid टाका, सापच काय कोब्राही फिरकणार नाही

साप हा असा प्राणी आहे, ज्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना धडकी भरते. सापाच्या एका दंशामुळे एखाद्याचे प्राण जाऊ शकतात.

पावसाळ्यात साप आजूबाजूला दिसण्याच्या शक्यत्या जास्त आहेत. अशावेळी तुम्हीली अलर्ट रहाणं जास्त गरजेचं आहे. शिवाय लोकांनी स्वतःचे रक्षण करणं गरजेचं आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सापांना तुमच्या घरात येण्यापासून रोखू शकता.

रात्री घराबाहेर जळणाऱ्या दिव्यांमुळे कीटक आकर्षित होतात. बेडूक, सरडे, उंदीर सहसा घरात घुसतात. त्यांच्या पाठोपाठ सापही घरात घुसतात.

बिनविषारी साप घरात आला तरी लोक त्याला घाबरतात. बहुतेक साप बिनविषारी असतात. त्यामुळे त्यांपासून धोका असेलच असं नाही.

जर तुम्हाला तुमच्या घराचं सापापासून संरक्षण करायचं असेल तर तुम्ही फिनाईल लिक्विड वापरू शकता.

शिवाय घरातील स्टोअर रूम आणि कचरा साफ करा. घराभोवती कार्बोलिक ॲसिड फवारले तर साप येणार नाहीत.

कार्बोलिक ऍसिडची फवारणी करावी. त्याचा प्रभाव आठवडाभर टिकतो. साप नेहमी त्याच्या वासापासून दूर राहतात.

तुम्ही ब्लॅक फिनाईल खरेदी करू शकता ज्याचा वापर हॉस्पिटलमधील मजले साफ करण्यासाठी केला जातो. त्याच्या वासाने साप नेहमी पळून जातात.