काय आहे फाल्गुनी पाठकच्या टॉम बॉय लुकचं सिक्रेट?

दांडिया क्विन म्हणून ओळखली जाणारी गायिका फाल्गुनी पाठक.

संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या फाल्गुनी पाठक वयाच्या 55व्या वर्षी सिंगल आहे.

फाल्गुनी पाठकच्या गाण्यांबरोबर तिचा टॉम बॉय लुकही फेमस झाला. 

फाल्गुनी पाठक प्रामुख्यानं गुजराती गाणी गाणारी सिंगर आहे.

याद पिया के आने लगी’ ते ‘चूड़ी जो खनके हाथों में’ सारखी अनेक गाणी तिनं अजरामर केली.

आपल्या टॉम बॉय लुकबाबत फाल्गुनीनं एका मुलाखतीत सांगितलं. 

फाल्गुनी म्हणाली, "माझ्या आई-वडिलांना चार मुली झाल्या. त्यांना मुलगा हवा होता".

"त्यांना मुलगा झाला नाही त्यामुळे मी लहानपणापासून मुलांसारखी राहू लागले".