Olympic चं मेडल खरंच सोन चांदीचं असतं का? 

Olympic चं गोल्ड मेडल जिंकणं हे प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं.

Olympic मध्ये प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत तीन क्रमांक काढले जातात. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला गोल्ड, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना सिल्व्हर तर तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला ब्रॉंझ मेडल दिले जाते.

साधारणपणे लोकांना वाटते विजेत्यांना मिळणार गोल्ड मेडल हे खरोखरच अस्सल सोन्याने बनलेलं असतं मात्र तसे नाही.

Olympic स्पर्धेत विजत्या स्पर्धकाला 529 ग्रॅम वजनाचं मेडल दिल जातं.

गोल्ड मेडलचा 95.4 टक्के भाग हा खरंतर चांदीचा (505 ग्रॅम) बनलेला असतो.

तर यात 6 ग्रॅम शुद्ध सोन असतं आणि 18 ग्रॅम लोह असतं.

पॅरिस ऑलंपिकमध्ये देण्यात येणाऱ्या एका गोल्ड मेडलची किंमत ही 850 डॉलर म्हणजे जवळपास 80 हजार रुपये असते.

forbes च्या सांगण्यानुसार जर ऑलंपिकच गोल्ड मेडल हे पूर्णपणे सोन्याचं असत तर त्याची किंमत ही जवळपास 41 हजार 161.50 डॉलर म्हणजेच सुमारे 34. 46 लाख इतकी असती.

याच कारणाने संपूर्ण सोन्याचं मेडल विजेत्यांना दिल जात नाही. मात्र 1992 आणि त्यापूर्वी  झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत विजेत्यांना शुद्ध सोन्याचं मेडल देण्यात आलं होत.  

सिल्व्हर मेडलच वजन हे सुमारे 525 ग्रॅम असतं ज्यात 507 ग्रॅम चांदी आणि 18 ग्रॅम लोह असते. याची किंमत जवळपास 41 हजार इतकी आहे.

कांस्य पदक म्हणजे ब्रॉंझ मेडलचं वजन हे 455 ग्रॅम असतं. यात 415 ग्रॅम तांब तर21. 85 ग्रॅम झिंक आणि 18 ग्रॅम लोह असतं.

याच मूल्य जवळपास 13 डॉलर म्हणजे 1100 रुपये असतं.