पावसात  लिंबाचा दिवा लावताच होईल 'चमत्कार'

लिंबाचा वापर तुम्ही बर्‍याच पद्धतीने करता. पण लिंबाचा दिवा बनवून तो कधी लावून पाहिला आहे का?

पावसाळ्यात लिंबाचा दिवा लावण्याचा मोठा फायदा आहे. 4 समस्यांतून तुमची सुटका होईल.

एक लिंबू घेऊन त्याचा वरील थोडा भाग कापून घ्या. लिंबाच्या आतील रस, गर काढून टाका.

आता 3-4 लवंग, थोडं कापूर घेऊन त्याची पूड करा.  ही पूड लिंबात टाका. 

त्यात कडुनिंबाचं तेल टाका. कडुनिंबाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. 

यात कापसाची फूलवात ठेवा. त्याच्या बाजूने पुन्हा थोडं तेल टाका. हा दिवा पणतीमध्ये ठेवा.

पावसाळ्यात डास, माश्या, चिलटे  आणि कुबट वास या समस्येतून लिंबाचा दिवा मुक्ती देईल.

Simply marathi यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

अंडी आणि दूध दोन्ही देणारे प्राणी