मोठे आणि विचित्र कानासाठी प्रसिद्ध आहेत 'हे' 7 प्राणी

असे अनेक प्राणी आपल्या आजूबाजूला आहेत जे त्यांच्या कानांमुळे खूप विचित्र दिसतात.

चला त्यांपैकी काही प्राण्यांची नावं फोटोसह जाणून घेऊ

सवानाच्या कॅराकलचे लांब कान त्यांना शिकार शोधण्यात मदत करतात.

मादागास्करच्या आये-आये चे कान खूप विचित्र आणि भितीदायक दिसतात.

सर्व्हलचे कान तिला एक अतिशय भितीदायक मांजर बनवते.

कोअलाचे कान त्यांच्या आकारामुळे विचित्र दिसतात.

हत्तींचे मोठे कान त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

फेनेक फॉक्सचे कान शरीरातील उष्णता काढून टाकण्यास मदत करतात.

लाल कांगारूंचे मोठे कान त्यांना धोका ओळखण्यात मदत करतात.