बॉलिवूडचे 8 खान जे निघाले महाफ्लॉप !

सलमान खान, शाहरुख आणि आमिर खान  हे तीन खान नावारुपाला येण्याआधी बॉलिवूड तब्बल 8 खान होते. कालांतराने त्यांचं करिअर फ्लॉप झाला.

2000 साली आलेल्या मेला या सिनेमातून अभिनेता फैसल खान प्रेक्षकांसमोर आला. निर्माते ताहिर हुसैन यांचा मुलगा. अभिनेता म्हणून फैसल प्रेक्षकांवर फारशी जादू करू शकला नाही. त्यांनं काही वर्षात अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. 

दिवंगत अभिनेते कादर खान यांचा मुलगा सरफराज खान हा तेरे नाम सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकला. सलमानबरोबर त्यानं काम केलं पण काही वर्षात त्यानं अभिनय क्षेत्र सोडलं. आता तो लाइम लाइटपासून पूर्णपणे दूर आहे.

दिग्गज अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान करिअरच्या सुरुवातील मोठ्या पडद्यावर सर्वांच्या नजरेच भरला. पण त्याला मिळालेलं स्टारडम त्याला टिकवता आलं नाही. अनेक वर्षांनी तो हीरामंडी या वेब सीरिजमध्ये दिसला. 

निक्की-अरबाजच्या प्रेमात लसणाची काडी; बिग बॉसच्या घरात मोठा राडा

हेही पाहा

अभिनेते अमजद खान यांचा मुलगा शादाब खान यानं देखील अभिनय क्षेत्र सोडलं. त्यानंतर त्यानं दिग्दर्शन आणि लेखन करण्यात मोर्चा वळवला पण तिथे त्याला यश मिळू शकलं नाही.

दिवंगत अभिनेत संजय खान यांचा मुलगा जायद खान यानं 2003 साली आलेल्या चुरा लिया है तुमने या सिनेमातून डेब्यू केला.अल्पावधीत त्याचा डाउनफॉल सुरू झाला. त्यानं अभिनय क्षेत्र सोडलं. 

शहजाद खान हा अभिनेते अजीत खान यांचा मुलगा. त्यानं अनेक सिनेमे आणि मालिकांमध्येही काम केलं. पण वडिलांइतकी प्रसिद्धी त्यांना मिळवता आली नाही. 

अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान यानं देखील अनेक दमदार बॉलिवूड सिनेमात काम केलं पण त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानं केलेले सिनेमे फ्लॉप ठरले.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा भाचा अयूब खान यानं रॉक ऑन, द डर्टी पिक्चर सार्खया सिनेमात काम केलं. त्यानंतही त्यानं अनेक सिनेमात काम केलं पण त्याला हवं तसं यश मिळू शकलं नाही.