सामंथानंतर या अभिनेत्रीसोबत दुसरं लग्न करतोय नागा चैतन्य!

अभिनेता नागा चैतन्य यानं शोभिता धुलिपाल हिच्याशी साखरपुडा केला.

8 ऑगस्टला हैद्राबादमध्ये दोघांचा साखरपुडा संपन्न झाला.

नागा चैतन्यने 2017 मध्ये सामंथा रूथ प्रभुसोबत लग्न केलं होतं. पण लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर काही दिवसातच नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.

 नागा चैतन्यने घटस्फोटाच्या तीन वर्षांतच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शोभिताने देखील दोघांचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 

सोशल मीडिया युजर्स शोभिता धुलिपालाला ट्रोल करत सामंथाला पाठींबा देत आहेत. 

पण अनेकांनी या दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छाही देत आहेत. 

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे दोघे कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.