खुशबूने सोडली मालिका, आता साकारणार ही भुमिका

खुशबू तावडे 'सारे काही तिच्यासाठी' या मालिकेत प्रमुख भुमिकेत होती.

खुशबू तावडे प्रेग्नंट असल्यानं तिनं मालिका सोडली आहे.

प्रेग्नंसीच्या 8 महिन्यात तिनं मालिकेसाठी काम केलं.

"मी आई होतेय. आईपण अनुभवण्यासाठी मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय", असं तिनं म्हटलं आहे.

खुशबूनं अभिनेता संग्राम साळवीबरोबर लग्न केलं.

खुशबू आणि संग्राम दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. त्यांनी आधी एक मुलगा आहे.

खुशबूने मालिका सोडल्यानंतर मालिकेत आता अभिनेत्री पल्लवी वैद्य उमाईची भुमिका साकारणार आहे.

पल्लवीनं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत पुतळाबाईंची भुमिका साकारली होती.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतही ती महत्त्वाच्या भुमिकेत होती.