झोपच पूर्ण होत नाही? फॉलो करा टिप्स

अनेकजणांना रात्री उशीरापर्यंत झोप लागतच नाही.

झोप पूर्ण न झाल्यानं त्यांना विविध व्याधींचा सामना करावा लागतो.

त्यामुळे आज आपण उत्तम झोपेसाठी काही रामबाण उपाय पाहणार आहोत.

ज्यामुळे आपल्याला बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागेल.

दररोज एका ठराविक वेळीच झोपावं.

दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा.

रात्रीचं जेवण झोपण्याच्या 2-3 तास आधी व्हायला हवं.

झोपताना कम्फर्टेबल लूज कपडे घालावे. शिवाय संध्याकाळनंतर चहा, कॉफी पिऊ नये.

सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.