माइकल जॅक्सनच्या घरी का असायचे 12 डॉक्टर?

डान्सर आणि पॉप सिंगर माइकल जॅक्सनच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची आजही चर्चा होते.

माइकलने प्रोफेशनल करिअर त्यानं कितीही मोठं नाव कमावलं तरी वैयक्तिक आयुष्यात तो कायम संघर्ष करत राहिला.

माइकलला 150 वर्ष जगायचं होतं. तो नेहमी ऑक्सिजन बेडवर झोपायचा.

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी काही माणसं ठेवली होती.

त्याचं जेवण देखील पहिल्यांदा लॅबोरेटरीमध्ये चेक व्हायचं.

कोणाला भेटायचं असेल तर तो आधी ग्लोज आणि मास्क परिधान करायचा.

दररोज त्याच्या घरी 12 डॉक्टर असायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दररोज त्याची तपासणी व्हायची.

असं म्हणतात की, माइकल जॅक्सन नशेच्या गोळ्या घेत होता. त्याचं व्यसन त्याला लागलं होतं.

 त्याला हार्ट अटॅक आला आणि 25 जून 2009 साली त्याचं निधन झालं.