केमिकलयुक्त फळं, भाज्या ओळखण्याच्या सोप्या टिप्स!

आजकाल बाजारात खऱ्या आणि केमिकलयुक्त फळं, भाज्यांमधला फरक ओळखणं असतं अवघड.

केमिकलयुक्त फळं, भाज्या खाल्ल्यानं बिघ़डू शकतं पोट, होऊ शकतात विविध आजार.

शरिरावर होऊ शकतात विपरीत परिणाम.

खाद्यपदार्थांवर संशोधन करणारे नरेंद्र बिजल्वाण सांगतात...

काही सोप्या टिप्सनी आपण अस्सल नैसर्गिक फळं आणि भाज्या चुटकीसरशी ओळखू शकता.

रासायनिक फळं, भाज्या जास्त चमकदार आणि आकारानं मोठे असतात.

रासायनिक फळं, भाज्यांमध्ये पोषक तत्त्व कमी असतात.

त्यामुळे या फळांचा वास कमी येतो आणि ती चवीलाही बेचव लागतात.

तर, अस्सल फळं, भाज्या चवदार आणि कमी चमकदार असतात.