डाळिंब खाणाऱ्यांनो टाळा या ५ गोष्टी, अन्यथा होईल नुकसान
थंड हवामानात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले डाळिंब व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.
परंतु योग्यरित्या या फळाचे सेवन न केल्यास आरोग्यच्या समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्यपोटी डाळिंब खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक आम्लांमुळे पोटात जळजळ किंवा अस्वस्थता होऊ शकते.
जास्त प्रमाणात डाळिंब खाल्य्यास त्यातील फायबरमुळे पचनाच्या समस्या जसे की, गॅस किंवा जुलाब होऊ शकतात.
डाळिंबाचे सेव्हन काही औषधांवर परिणाम करू शकते, विशेषतः रक्त पातळ करणारी किंवा कोलेस्ट्राल कमी करणारी औषधे घेत असाल तर सावधगिरी बाळगा.
काही लोकांना डाळिंब खाल्ल्यावर ऍलर्जी होऊ शकते, जसे की, अंगावर खाज सुटणे, सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे. अश्या प्रतिक्रिया आढळल्यास डाळिंब खाणे टाळा.
कच्चे डाळिंब खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता असते, नेहेमी ताजे आणि पिकलेले डाळिंब खावे.
न्यूज18 मराठी या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.