या शेतीनं शेतकऱ्याला केलं मालामाल

सध्याच्या काळात शेतकऱ्यांसाठी यूट्यूब हे प्रशिक्षण आणि उपजीविकेचे चांगले साधन ठरत आहे.

त्यामुळे काही शेतकरी हे यूट्यूबच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन चांगले पैसे कमवत आहेत.

बेगुसराय येथील शेतकरी वीरेंद्र कुमार यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे.

बेगुसराय जिल्हा येथील गाडा गावातील निम्मे लोकसंख्या भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेत आहेत.

त्यात परवलचाही समावेश असून त्याला मोठी मागणी होत आहे.

वीरेंद्र कुमार हे हरित खताचा प्रयोग करुन अर्धा एकरमध्ये परवलची शेती करत आहेत.

यासाठी त्यांना 20 हजार रुपये खर्च आला.

अर्धा एकरमधून परवलची शेती करुन वार्षिक 8 लाख रुपयांचे उत्पन्न घेता येते.

सध्या येथे प्रत्येक दोन दिवसांनी एक क्विंटलहून अधिक उत्पादन निघत आहे.