सिंह राशीच्या लोकांना ऑगस्ट कसा असणार?
नवीन दिवस, महिना किंवा वर्ष सुरू झालं की अनेकजण आधी राशीभविष्य पाहत असतात.
आता ऑगस्ट महिना सुरू झाला असून अनेकांना मासिक राशीभविष्य जाणून घ्यायचं असेल.
पुण्यातील ज्योतिष वेदमूर्ती कुलदीप जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कुटुंबात उद्धटपणा आणि गोंधळामुळे जोडीदाराशी काही वाद होण्याची शक्यता आहे.
मुख्य ग्रह शनीची स्थिती चांगली नसल्यामुळे अपयशाला सामोरे जावे लागू शकते.
बृहस्पती तुम्हाला विवाह आणि धन लाभ सोबत शुभ संधींचा लाभ देईल.
नवव्या भावात गुरू असल्यामुळे राशीच्या करिअर मध्ये पदोन्नतीची शक्यता आहे.
आध्यात्मिक कार्यासाठी खूप प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरेल.
ग्रहांच्या स्थितीमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे.
18 ऑगस्ट पर्यंत तुमचे वैयक्तिक जीवन देखील उलथापालथींनी भरलेले असेल.
सूर्यग्रहाची उपासना करणे आणि सूर्याच्या 12 नावांचा जप करणे हे उपाय करू शकता, असे जोशी यांनी सांगितले.