वडेट्टीवार इतिहास बदलणार?

काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे.

राज्यातले विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षात जातात, असा गेल्या काही काळातला इतिहास आहे.

1995 ते 1999 साली काँग्रेसचे मधुकरराव पिचड विरोधी पक्षनेते होते. 

2019 विधानसभा निवडणुकीआधी पिचड भाजपमध्ये गेले.

1999 ते 2004 साली नारायण राणे विरोधी पक्षनेते होते.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून पहिले काँग्रेस आणि मग भाजपमध्ये प्रवेश केला.

रामदास कदम 2005 ते 2009 साली विरोधी पक्षनेते होते.

रामदास कदम आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

2009 ते 2014 साली एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते.

फडणवीस सरकारमध्ये खडसे मंत्रीही होते, पण त्यांना राजीनामा द्यावा लागला.

भाजपमध्ये नाराज झालेल्या खडसेंनी 2020 साली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

2014 साली भाजपचं सरकार आलं तेव्हा सुरूवातीला शिवसेना विरोधी पक्षात होती. 

12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 या कालावधीत एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते.

शिंदेंनंतर 2014 ते 2019 राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते.

विखे-पाटील यांनीही 2019 निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला.

2022 साली एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले.

2023 साली जुलै महिन्यात अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन सत्तेमध्ये सहभागी झाले.

आता विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते झाले आहेत.