वृषभ राशीसाठी कसा असेल ऑगस्ट महिना?
ऑगस्ट महिन्याला आता सुरुवात झालीय. ऑगस्ट महिन्यात काही ग्रहांची उलथापालत होत आहे.
यामुळे राशी चक्रावर परिणाम होत असला तरी वैयक्तिक कुंडलीतील ग्रह काय सांगतात हे देखील महत्त्वाचे आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल याबाबत मुंबईतील गुरुजी परशुराम बट्टर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्यातील 7 तारखेच्या 11.02 मिनिटांच्या सुमारास शुक्र हा कर्क राशीत प्रवेश करत आहे.
यामुळे वृषभ राशी असणाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.
त्यासोबतच शारीरिक आरोग्य देखील स्वास्थ असेल. कुठलेही विकार होणार नाहीत.
17 ऑगस्टला 01:32 मिनिटांना सूर्य हा सिंह राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या काळात लांबचा प्रवास टाळणे योग्य ठरेल.
18 ऑगस्ट रोजी मंगळ हा कन्या राशीत प्रवेश करत असल्याने लग्न योग जुळून येणार आहेत.
लग्नविवाह संबंधी राहिलेली काम ऑगस्टच्या मध्यास पूर्ण होताना दिसून येतील.
ऑगस्ट महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या हा महिना साधारण असेल, अशी माहिती गुरुजी परशुराम बट्टर यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)