ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स Brown रंगाचा का असतो?

कधीही आपण ऑनलाईन काहीही मागवलं की शॉपिंग कंपन्या भरभरुन डिस्काउंट देतात. शिवाय ऑफर्सही असतात. ज्यामुळे घरबसल्या गोष्टी मिळतात.

कोणतीही वस्तु घरी येतात तेव्हा त्या नेहमीच एका बॉक्समध्ये पॅक करुन येतात. मग ती वस्तू लहान असोत किंवा मोठी

कधी असा प्रश्न पडलाय का तो ब्राऊन रंगाचाच का असतो? तो सफेद, निळा किंवा दुसऱ्या रंगाचा नसतो?

हे पार्सल ज्या कुरिअर बॉक्समधून येते, तो बॉक्स कार्डबोर्ड किंवा पुठ्ठ्याचा बनलेला असतो. जो संपूर्ण कॉर्पस कागदाचा असतो.

आपल्याला झाडापासून कागद मिळतो आणि या कागदाला ब्लीच केलं नसेल तर तो तपकिरी किंवा ब्राऊन रंगाचा दिसतो.

आपण जो सफेद किंवा इतर रंगाचे कागद वापरतो ते ब्लीच केलेले असतात ज्यामुळे ते थोडे महाग असतात. कारण ब्लीचला वेगळा खर्च येतो.

कागद नैसर्गिकरित्या तपकिरी असतो कारण तो झाडांच्या खोड, लाकूड आणि सालीपासून बनलेला असतो. ज्यामुळे तो तपकिरी रंगाचा असतो.

आपण जेव्हा Amazon किंवा Flipkart सारख्या कंपन्यांकडून वस्तू मागवतो, तेव्हा आपल्याला ती कमीत कमी पैशांत हवी असते.

कोणताही ग्राहक पॅकिंगसाठी जास्त पैसे देऊ इच्छीत नाही, त्यामुळे या कंपन्या कार्डबोर्डच्या ब्लीचिंगवर पैसे खर्च करत नाहीत.

ज्यामुळे हे बॉक्स कमीत कमी पैशात विकत घेऊन किंवा बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातात.