Vastu Tips: घरात आरसा या दिशेला लावणं शुभ

आजच्या आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळतात

परंतु काही वेळा सावधगिरी बाळगूनही घरात नकारात्मक ऊर्जा राहते.

घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा माहीत नसल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात.

वास्तूनुसार आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा.

योग्य दिशेला लावलेला आरसा घरात सुख, शांती आणि आर्थिक प्रगती करतो.

आरसा योग्य दिशेला लावल्याने समाजात घरातील लोकांचा मान-सन्मान वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार घरातील आरशाचा आकार नेहमी चौकोनी ठेवावा.

घरात बसवलेला आरसा नेहमी स्वच्छ असावा, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा स्पष्ट दिसावा.

घरात बसवलेला आरसा तुटला किंवा थोडासाही तडा गेला तर तो लगेच बदलायला हवा.