कशी घ्यावी मेकअप साहित्याची काळजी?

प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची भारी हौस असते.

अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्किनकेयर वापरत असतात परंतु हे स्किनकेयर नेमके कुठं ठेवावीत हे अनेकांना माहिती नसतं .

बहुतांश जण हे स्किनकेयर प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवतात. तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती लगेच बदला.

  पुण्यातल्या ब्युटीशियन प्रेरणा देशमुख यांनी या विषयाबद्दलचा धोका सांगितला आहे.

मेकअप प्रॉडक्ट्स कधीही बाथरुममध्ये ठेवू नयेत. तेथील गरम आणि दमट वातावरणात ते खराब होऊ शकतात.

त्याचा त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो, असा सल्ला देशमुख यांनी दिला.

गरम शॉवर घेतल्यानंतर तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ऑक्सिडाइझ होऊ शकतात आणि उष्णतेमुळे ते खराब होऊ शकतात.

म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी सीरम, नाईट क्रीम, फेस मास्क आणि डोळ्याच्या क्रीम नेहमी फ्रिजमध्ये ठेवावेत.

या व्यतिरिक्त प्रॉडक्टस केबिनमध्ये ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.