गुलाब शेतीतून शेतकरी मालामाल! 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती सतत अस्मानी संकट कोसळत असते. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.

यामुळे हातात आलेले पिके नाहीसे होऊन जातात. यामुळे शेतकरी खचून जातात.

मात्र काही शेतकरी हे हिंमत सोडत नाहीत तर शेती करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करतात.

असंच काहीसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील बाबासाहेब गोजरे या शेतकऱ्याने केले आहे.

पारंपरिक पिकांना दूर करून गुलाब फुलांची शेती केली असून त्यामध्ये त्यांना यश आले आहे.

त्यांना गुलाब फुलांतून लाखोंची कमाई होत आहे.

त्यांनी दोन हजार रोप लावलेली आहेत. पुण्यावरून त्यांनी ही रोपं आणली.

तिन वर्षापासून दर महिन्याला 1 लाख ते सव्वा लाख रुपये गुलाब फुलांच्या विक्री मिळतात, असं बाबासाहेब गोजरे यांनी सांगितले.