असे जीव ज्यांचं रक्त लाल नाही

सगळ्यांचंच रक्त हे लाल रंगाचं असतं असा अनेकांचा समज आहे. पण असे काही पृथ्वीवर जीव आहेत. ज्यांचं रक्त लाल नाही.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य नक्कीच वाटलं असेल, चला अशा प्राण्यांची यादी पाहू 

पीनट वॉर्म ही एक प्रकारची अळी आहे, जिचं रक्त जांभळ्या रंगाचं आहे.

हेमोएरिथ्रीन नावाचे प्रथिने शरिरात ऑक्सिडाइज केले जाते तेव्हा रक्ताचा रंग जांभळा किंवा कधीकधी गुलाबी असतो.

सी-कुकुम्बर या समुद्रात मिळणाऱ्या जीवाचा रंग हा पिवळा आहे. या जीवाचं रक्त पिवळं का आहे, याचं कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांना कळू शकलेलं नाही.

आईसफिश हा मासा अंटार्क्टिक समुद्राच्या खोलवर आढळतो, जिथलं तापमान अतिशय थंड असतं. ज्यामुळे या फिशची रचनाच अशी आहे की त्याचं रक्त रंगहीन असतं.

हे मासे पारदर्शक असतात. म्हणजेच या माशाच्या रक्तात हिमोग्लोबिन आणि हिमोसायनिन नसतं.

न्यू गिनिया या सरड्याचं रक्त हे हिरवं असतं. ज्यामुळे हा सरडा संपूर्ण हिरवा असतो, त्याची जीभ आणि स्नायू देखील हिरव्या रंगाचे असतात.

ऑक्टोपस या जीवाला अनेक देशात लोक आवडीने खातात देखील. परंतू या ऑक्टोपसचं रक्त लाल नाही तर निळं आहे.