Off-white Banner

प्राजक्ताने हातावर गोंदवलयं 'या' खास व्यक्तीचं नाव!

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय.

हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो.

प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.

याबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, 'मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे.'

'माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटायचे.' म्हणूनच तिने ओशोंच्या नावाचा टॅटू केला. 

'ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवु शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवला.' असा खुलासा प्राजक्तानं केला होता. 

प्राजक्ताच्या या टॅटूची नेहमीच चर्चा होते.