चक्क पक्ष्यांसाठी झाली होती निवडणूक

आपल्याला निवडणुका माहिती असतील पण महाराष्ट्रात चक्क पक्ष्यांची निवडणूक झाली होती. 

वर्धेकरांनी निवडणुकीत शहर पक्षी निवडल्याच्या घटनेला पाच वर्षे झाली आहेत. 

वर्ध्यात बॅचलर्स रोड वर ऐटीत उभे असलेले पाच पक्षी सर्वांचं लक्ष वेधून घेताहेत. 

ठिपके वाला पिंगळा, पांढऱ्या छातीचा धिवर, तांबट, कापशी घार आणि निलपंख हे ते पक्षी आहेत.

आपल्या शहराचा एक पक्षी असावा यासाठी 2018 मध्ये वर्धा येथे निवडणूक झाली.

नेचर फाउंडेशनच्या पुढाकाराने 23 जून ते 15 ऑगस्ट 2018 या काळात मतदान झालं. 

22 ऑगस्टला झालेल्या मतमोजणीत निलपंख हा पक्षी 52 हजार मतांनी निवडून आला. 

तेव्हापासून 22 ऑगस्ट हा दिवस वर्धा येथे शहर पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो.

जेष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी निलपंख पक्षी वर्धा शहर पक्षी म्हणून घोषित केला होता. 

आता निलपंखचा भंगार पासून बनलेला आकर्षक स्टॅच्यू वर्ध्यात येणाऱ्यांचे स्वागत करतोय.