उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक अजब घटना समोर आली

यात एक नवरी नवरदेवाच्या नावाची मेंदी लावून त्याची वाट पाहात होती

पण तो आपल्याच नवरीच्या बहिणीसोबत पळून गेला

त्याचे नवरीसोबतच तिच्या बहिणीसोबतही प्रेमसंबंध होते

पण वधू आणि तिच्या कुटुंबीयांना हे माहीत नव्हतं

विशेष म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन ते दोघं लग्न करत होते

मात्र ऐनवेळी नवरदेवाने नवरीला धोका दिला

ऐनवेळी तो मेहुणीसोबत पळून गेल्याने सगळ्यांना धक्का बसला

वधू पक्षाने नवाबगंज पोलीस ठाण्यात नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल केला

पोलीस वराचा आणि मेहुणीचा शोध घेत आहेत.