पावसाळ्यात त्वचेला खाज सुटली आहे? करा 'हा' उपाय
पावसाळा सुरू होताच हवामानात मोठा बदल होतो. या बदलत्या हवामानात काही आजार डोकं वर काढतात.
यामध्ये त्वेच्या आजारांचाही समावेश असतो. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचेवर चिकटपणा येतो, त्यामुळे खूप खाज सुटते.
पावसाळ्यात जास्त घाम येतो. त्यामुळे खाज येऊ शकते.
ही खाज कमी व्हावी यासाठी काही उपाय पुण्यातल्या श्री जगन्नाथ हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित चित्ते यांनी दिली आहे.
बाहेरुन आल्यानंतर साबणानं हातपाय धुणे आवश्यक आहे. ओलसर तसंच नायलॉनचे कपडे घालणं टाळावं.
त्यामुळे त्वचेला खाज सुटते. आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकून त्यानं आंघोळ करावी.
आंघोळीसाठी नेहमी गरम पाणी वापरावे, अशी माहिती चित्ते यांनी दिली.
शरिरावरील पुरळ शांत करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरू शकते.
या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांसह अनेक गुणधर्म आहेत.
ते वापरण्यासाठी, आंघोळ करण्यापूर्वी त्वचेच्या प्रभावित भागावर खोबरेल तेल लावा आणि काही वेळ ते सोडा.
नंतर सामान्य पाण्याने
आंघोळ
करावी. यामुळे खाज शांत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
(टीप : बातमीतील सल्ला हा तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)