त्रिशुंड गणपती मंदिर पाहिलंत का?

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात अनेक प्राचीन मंदिर आहेत.

ग्रामदैवत कसबा गणपती, सारसबाग, चतु:श्रृंगी ही मंदिर प्रसिद्ध आहेत. इथं भाविकांची नेहमी गर्दी असते.

त्याचबरोबर त्रिशुंड गणेश मंदिर देखील एक अपरिचित पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर आहे.

1754 च्या दरम्यान बांधलेल्या या मंदिराचा इतिहास फारसा कुणाला माहिती नाही.

त्रिशुंड गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे.

शहाजीराजांनी इ.स. 1600 मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला चालना दिली.

इंदूरजवळच्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू केले.

1770 पर्यंत हे काम सुरू होते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत आणि एक फारशी शिलालेख आहेत.