सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक, कसं ओळखायचं?

अनेक घरांमध्ये जेवण शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा उपयोग केला जातो. यावर जेवण शिजवणे खूप सोईस्कर पडते.

पण बऱ्याचदा जेवण बनवताना सिलेंडरमधील गॅस संपून जातो. अशावेळी घरी दुसरा भरलेला सिलेंडर नसला तर मोठी तारांबळ उडते.

 परंतु आता तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता.

एक ओला टॉवेल घेऊन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळा.

 सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यावर टॉवेल बाजूला काढून ठेवा.  

मग टाकीचे निरीक्षण करा की टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे तसेच कोणता भाग जास्त वेळ ओला राहतो.

सिलेंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका भाग तुम्हाला सिलेंडरमधील गॅसची लेव्हल सांगतो. 

जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा संपला आहे. 

तसेच जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. त्यामुळे सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही. 

पण त्याउलट ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.