हातमोजाच्या मदतीनं समजणार मूकबधिरांची भाषा!
अनेक वेळा रस्त्यानं जात असताना आपल्याला मुक बधीर लोक दिसून येतात.
रस्ता चुकल्याने किंवा काही माहिती हवी आसल्यास ते आपल्याशी बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.
ते ज्या भाषेत संवाद साधतात ती भाषा आपल्याला समजत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणे अवघड जाते.
आता त्यांनी केलेले हावभाव आपल्याला समजणार आहेत. ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी यासाठी एक खास यंत्र तयार केलंय.
ठाण्यातल्या ए. पी. शहा या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन साईनटोन हे यंत्र तयार केले आहे.
हातमोज्यांचा वापर करून हे यंत्र तयार केलंय. मूकबधिरांचे हावभाव सर्वसामान्य नागरिकांना कळावेत.
यासाठी त्यांनी नागरिकांच्या सांकेतिक भाषेचे रुपांतर शब्दात आणि आवाजात करणारे साईनटोन हे यंत्र तयार केले आहे.
हे यंत्र हातमोज्यांना जोडले असून मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे असा मेसेज व व्हाईस नोट मोबाईलवर पाठवतात.
त्यामुळे आता मूकबधिर लोकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे.