कोकणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचाय? ‘इथं’ संपेल शोध

निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कोकणाची खाद्यसंस्कृती देखील श्रीमंत आहे.

भात आणि मासे हे कोकणाचं प्रमुख अन्न. त्याचबरोबर येथील शाकाहारी पदार्थही लोकप्रिय आहेत.

कोकणातले हे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी पुणेकरांना कोकणात जाण्याची गरज नाही.

पुण्याच्या जवळच अस्सल कोकणी पदार्थांची चव तुम्हाला चाखता येईल.

पुण्याजवळच्या चिंचवड गावातील दैवशील जाधव या मराठी माणसानं इंदवटी हे अस्सल कोकणी पदार्थ देणारे हॉटेल सुरु केलंय.

या हॉटेलात गावच्या खास कोकणी मसाल्यांची रेसीपी त्यांनी वापरली आहे.

इथं मिळणाऱ्या माशांच्या विविध डीशमध्ये प्रामुख्याने ओल्या नारळाचा वापर केला जातो.

याठिकाणी भरलेले पापलेट, मांदेली आणि बोंबील, बांगडा फ्राय आदी पदार्थाची मेन्यु कार्डमधली नावे वाचतानाच तोंडाला पाणी सुटु लागते.

मासेच नव्हे तर चिकन आणि मटनाचे कोंबडी वडे, मटण भाकरी , कोंबडी वडे  असे विविध प्रकार येथे मिळतात.