डोंबिवली पूर्व भागातील घरांचे दर पश्चिमेपेक्षा जास्त का आहेत? 

मुंबईत किंवा उपनगरात आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.

घराच्या वाढत्या किंमतीमुळे मुंबईत घर घेणं ज्यांना शक्य होत नाही त्यांची डोंबिवलला मोठी पसंती असते.

डोंबिवलीत घर घेताना पूर्व भागात घेण्याची अनेकांची पसंती असते.

मुंबईतील अनेक उपनगरात पश्चिमेपेक्षा पूर्वेला जास्त पसंती असते.

पण डोंबिवली शहर याला अपवाद आहे, याचं नेमकं कारण काय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड फडके रोड या महत्त्वाच्या भागातील जागेचे दर जास्त आहेत.

या भागात  पश्चिमेच्या तुलनेत प्रती चौरस फुट एक ते दीड हजार रुपये जास्त दर आहेत.

डोंबिवलीच्या सांस्कृतिक घडामोडींचं फडके रोड हे केंद्र आहे.

गुढी पाडव्याला निघाणारी शोभायात्रा, डोंबिवलीचं जुनं गणेश मंदिर हे देखील फडके रोडला आहे.

त्यामुळे या भागात दर जास्त आहेत, असं बांधकाम व्यावसायिक सचिन चिटणीस यांनी सांगितलं.

ठाणे या शहरांना जाण्यासाठी देखील डोंबिवली पूर्व अधिक सोयीचे आहे

त्यामुळे या भागात जागांचे दर हे जास्त असल्याचं चिटणीस यांनी सांगितलं.