बांबूची राखी निघाली परदेशात
बांबूची राखी निघाली परदेशात
प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जीवन सुंदर करण्याचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी असतो
व्यवस्थेशी दोन हात करत एक महिला आकाशाला गवसणी घालू शकते.
याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चंद्रपूरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मीनाक्षी मुकेश वाळके या आहेत.
महाराष्ट्र आणि देशाला त्या 'द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र' म्हणून परिचित आहेत.
चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मीनाक्षी वाळके या अत्यंत गरिबीत राहत होत्या.
चंद्रपूरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबूचं उत्पादन होत असल्यानं त्यापासून त्यांनी वस्तू बनवायला सुरुवात केली.
आता रक्षाबंधन जवळ आला असून मीनाक्षी यांनी बांबूपासून विविध प्रकारच्या राख्या बनवल्या आहेत.
मीनाक्षी यांनी सहकाऱ्यांसह बनवलेल्या पर्यावरणपुरक आकर्षक राखींना देश विदेशातून मागणी आहे.
लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटाशी तोंड देणाऱ्या महिलांना आता राखीने बळ दिले आहे.
बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनवणाऱ्या मीनाक्षी आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.