समुद्रात आढळणारे 10 सर्वात विषारी मासे

सी लॅम्प्रे हे प्राणी त्यांच्या विशिष्ट आकाराच्या तोंडानं समोरच्यावर हल्ला करतात.

फिल्ड शार्क एखाद्या सापाप्रमाणे हा त्याची शिकार पकडतो. त्याच्या दातांमुळे या माशाचं नाव भीतिदायक प्राण्यांमध्ये येतं.

स्टारगेझर हा अतिशय विषारी मासा आहे. तो त्याच्या जवळून जाणाऱ्या भक्ष्याला विजेचा धक्का देतो आणि नंतर खातो.

पेलिकन ईल त्याचा जबडा खूप मोठा आहे. त्यामुळे खूप मोठं भक्ष्यही तो खाऊ शकतो.

अँग्लर फिश हे मासे समुद्राच्या तळाशी राहतात. ते त्यांच्या शरीराच्या बाहेर असणाऱ्या कृमीसारख्या दिसणाऱ्या गोष्टीनं शिकार करतात.

मेगामाउथ शार्क हा मासा तोंड उघडं ठेवूनच हा पोहतो, जेणेकरून एखादं भक्ष्य आपसूकच तोंडात जाईल.

स्टोनफिश हे मासे समुद्रातल्या दगडांसारखे किंवा शैवालांसारखे दिसतात; मात्र हे सर्वांत जास्त विषारी माशांमध्ये मोडतात.

ब्लॅक ड्रॅगन फिश हे मासे खूप खोल पाण्यात राहतात. त्यांच्या खूप मोठ्या दातांमुळे त्यांना हे नाव पडलं असावं.

कॅन्डिरू फिश हा अ‍ॅमेझॉनमध्ये राहणारा छोटासा कॅट फिश आहे. त्याला व्हॅम्पायर फिश असंही म्हणतात.

नॉर्दर्न स्नेकहेड त्यांची संख्या कमी करण्यासाठी या माशांना पकडून खाण्यासाठी तिथलं सरकार नागरिकांना प्रोत्साहन देतं.