मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडला मजूर, मग केलं धक्कादायक काम
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील डुबौलिया येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी 30 वर्षीय आरोपी उमेश चौहान याला अटक करण्यात आली आहे.
अयोध्येत राहणारा उमेश चौहान हा मुलीच्या घरी मजूर म्हणून काम करायचा.
उमेश चौहान याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो घरातून मुलीला घेऊन पळाला.
तेथे त्याने अनेक दिवस त्या मुलीवर अत्याचार केला.
त्याचे मन भरल्यानंतर आठवडाभरानंतर त्याने त्या मुलीला तेथून पळवून लावले.
ज्यानंतर मुलीने आपल्या घरच्यांना संपूर्ण घटना सांगितली आणि त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेश चौहानला अटक केली आहे.