मडक्यातली बिर्याणी खायची असेल तर ‘इथं’ संपेल शोध
जगभरातील वेगवेगळे खाद्यपदार्थ पुण्यात मिळतात.
त्याचबरोबर पारंपारिक पदार्थ खाण्यासाठीही अनेकांना पुणंच आठवतं.
नेहमीचे पदार्थ हटके पद्धतीनं देणारे पदार्थही पुण्यात मिळतात.
मडक्यातली बिर्याणी हा पदार्थ हा देखील पदार्थ सध्या पुण्यात फेमस आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लक्ष्मी रोडवरील पॉटर्स बिर्याणीमध्ये हा प्रकार मिळतो.
या हॉटेलमध्ये सर्व मातीचेच भांडी आहेत. जेवण करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठाी देखील मातीचेच भांडे दिली जातात.
इथं बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून त्याची किंमत 120 ते 310 रुपये इतकी आहे.
या हॉटेलमध्ये तुम्हाला हैद्राबादी चिकन दम बिर्याणी, बार्बेक्यू चिकन दम बिर्याणी अशा सात ते आठ प्रकारच्या बिर्याणी इथं खायला मिळतात.