पावसाळ्यात लाईटवर माशा भिरभिरतात? करा हे सोपे उपाय

झेंडू आणि तुळस : घरात कीटक किंवा पाखर येत असतील तर एका कोपऱ्यात झेंडूच्या फुलांचा गुच्छ किंवा तुळशीची पाने ठेवा.

झेंडू आणि तुळशीच्या पानांच्या वासाने कीटक घरात येण्याचं प्रमाण कमी होईल.

घराची साफसफाई करण्यासोबतच, खिडकी-दारे, ट्यूबलाइट, बल्ब यांची साफसफाई करत रहा.

सफाई करण्यासाठी दोन कप पाण्यात एक कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा.

या मिश्रणात कापड बुडवून पिळून खिडक्या आणि दारांसह बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करा. यामुळे माशा घरात येणार नाही.

संध्याकाळी दिवे लावण्यापूर्वी तुम्ही दार खिडक्या बंद करा. घरात शिरण्याचे सर्व मार्ग बंद असल्याने किडक घरत प्रवेश करणार नाहीत.

पावसाळ्यात घरातील ट्यूब लाईटवर दिवे येत असतील तर घरातील दिवे काही काळासाठी बंद करा.

दिवे बंद केल्यावर घरात येणारे कीटक आणि पाखर निघून जातील.

घरी येणाऱ्या माशांपासून मुक्ती मिळवायची असेल तर एअर फ्रेशनर तयार करून त्याचा वापर करू शकता.

एअर फ्रेशनर बनवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा, निलगिरीचे काही थेंब, यूकेलिप्टस, सिट्रोनेला, एसेंशिअल ऑइल, लिंबाचा रस एकत्र करून मिक्स करा.

मग तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून दिवसातून काही वेळा स्प्रे करा.