वर्षातून दोनदाच पाहता येतो हा किल्ला

वर्षातून दोनदाच पाहता येतो हा किल्ला

नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात एक ब्रिटिश काळातील भक्कम किल्ला आहे. 

ब्रिटिश-मराठ्यांच्या युद्धाचे आणि नागपूर नगरीच्या जाज्वल्य इतिहासाचे ते प्रतीक आहे. 

सीताबर्डीचा किल्ला हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशीच पर्यटकांना पाहायला मिळतो. 

आजघडीला ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. 

दोन टेकडीवर वसलेला किल्ला हा एकेकाळी ओसाड टेकडी म्हणून प्रचलित होता. 

870 एकरवर वसलेला सीताबर्डी किल्याच्या आतमध्ये भक्कम बांधणीच्या वास्तू आहेत. 

या टेकड्यांच्या पायथ्याशी दोन यदुवंशी बंधू शीतलाप्रसाद आणि बद्रीप्रसाद गवळी यांचे वास्तव्य होते. 

या दोन बंधूंच्या नावावरून सीताबर्डी असे नाव पडल्याचे स्थानिक सांगतात.

1817 मध्ये अप्पासाहेब भोसले आणि ब्रिटिशांमध्ये सीताबर्डीची नजीक मोठी लढाई झाली होती. 

किंग जॉर्ज (पाचवा) आणि राणी मेरी नागपुरात आल्याची आठवण म्हणून किल्ल्यात उभारलेला स्तंभ आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 1923 मध्ये या किल्ल्यावरील तुरुंगात ठेवण्यात आले होते. 

सैन्याने आखलेल्या मार्गानेच किल्ला पाहावा लागत असल्याने सर्व भाग पाहाता येत नाहीत.