24 पेक्षा जास्त प्रकारच्या पुरणपोळ्यांचा ‘इथं’ घ्या आस्वाद 

श्रावण हा सण आणि उत्सवांचा महिना आहे.

या महिन्यात उपवास सोडण्यासाठी घरी गोड धोड पदार्थ केले जातात.

यामध्ये पुरणपोळीचा सुद्धा समावेश असतो. त्यामुळे घरी पुरणपोळी बनवली जाते.

पुरणपोळी बनवताना बहुधा खूप वेळ जातो. पण, आता पुण्यात खास पुरणपोळी घर सुरू झालं आहे.

यामध्ये तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकारच्या पुरणपोळ्या खायला मिळतात.

पुण्यातील अपर्णा सांभारे यांनी पुरणपोळी घर सुरू केले आहे.

अंजीर पुरणपोळी, ड्रायफ्रूट पुरणपोळी, खोबरे पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, असे 24 पेक्षा जास्त प्रकार येथे मिळतात.

365 दिवस ही पुरणपोळी आता कधीही खाता येणार आहे.

या ठिकणी पुरणपोळीची किंमत 30 रुपयांपासून 70 रुपये आहे, असं अपर्णा सांभारे यांनी सांगितले.

पुरणपोळी घर हिंजवडी छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ म्हातोबा मंदिर येथे आहे.