सिनेमा नाही तर या उद्योगातून मोठी कमाई करतो सनी देओल!

सनी देओलचा गदर 2 सुपरहिट झाला आहे. या चित्रपटासाठी त्याने 10 ते 15 कोटींची कमाई केली आहे. 

आता गदर 2 नंतर सनी देओलने फीस वाढल्याची बातमी आहे. 

सनी देओल आता चक्क 50 कोटी एवढी फी घेणार असल्याचं बोललं जातंय. 

चित्रपटांसोबतच सनी देओल रेस्टोरंट बिझनेसमध्ये देखील आहे. यातूनही तो मोठी कमाई करतो. 

यासोबतच सनी देओल एक निर्माता देखील आहे. 'विजेता प्रोडक्शन हाऊस' चा सगळा कारभार हाच अभिनेता बघतो. 

सनी देओलचा एक प्रिव्हयु थिएटर आणि डबिंग स्टुडिओ देखील आहे. 

तसंच सनी देओल जाहिरातींमधूनही कोट्यवधींची कमाई करतो. एका ब्रॅण्डसाठी तो 2 ते 3 कोटी घेतो. 

सिनॉलेज च्या रिपोर्टनुसार, सनी देओलकडे संपूर्ण 130 कोटींची संपत्ती आहे. 

सनी देओल मुंबईच्या 'धर्मेंद्र हाऊस'  मध्ये राहतो ज्याची किंमत तब्बल 6 कोटी असल्याचं सांगितलं जातं.