शेतकऱ्याची कमाल, 7 महिन्यात मालामाल

शेतकऱ्याची कमाल, 7 महिन्यात मालामाल

अलिकडे उच्च शिक्षित तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. 

जालना जिल्ह्यातील युवा शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे वळत आहेत. 

सध्या निपाणी पिंपळगावचे शेतकरी सोमेश्वर वैद्य यांच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे. 

अवघ्या 21 दिवसांच्या एका बॅचमधून एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न त्यांनी घेतलंय. 

मोसंबी उत्पादक असणाऱ्या वैद्य यांनी मोसंबीची बाग काढून दोन एकर तुती लावली.

योग्य नियोजनामुळे पहिल्याच बॅच मध्ये 21 दिवसांत त्यांना 70 हजार रुपये मिळाले. 

यानंतर त्यांनी या कामात सातत्य राखले अन् प्रत्येक बॅचला रेशीम कोष उत्पादन वाढत गेले. 

आताच्या सातव्या बॅचमध्ये वैद्य यांनी 1 लाख 17 हजार रुपये मिळवले आहेत. 

दोन एकरातील सात बॅचमधून सात लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे वैद्य सांगतात. 

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी जिल्हा स्तरावरून देखील प्रयत्न होत आहेत.