ही पोळी तुम्ही वर्षभर खाऊ शकता! 

फ्रोझन फूड म्हणजे अगदी कमी तापमानात गोठवून ठेवलेल अन्न.

या प्रक्रियेमुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य, चव आणि पोत दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

यामध्ये फळे, पालेभाज्या, मांस, सीफूड, तयार जेवण आणि स्नॅक्स यासारखे विविध प्रकारचे गोठलेले अन्न पाहिला मिळते.

पण त्याच पद्धतीने फ्रोझन केलेली पोळी देखील आता पुण्यात मिळत आहे. हि पोळी वर्षभर खाते येते.

यामुळे ज्यांना पोळी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा बाहेर राहतात त्यांच्यासाठी ही पोळी एक चांगला पर्याय आहे.

पुण्यात राहणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे हे फ्रोझन पोळी तयार करतात.

व्यवसाने इंजिनिअर असणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे यांनी 6 वर्षा पूर्वी या पोळ्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली.

या पोळ्या तयार करत असताना त्यांनी एक स्वतः मशीन तयार केले या मशीनद्वारे 1 तासामध्ये 500 पोळ्या तयार होतात.

एक सारख्या तापमानावर भाजल्या जातात. कमी श्रमात जास्त काम या मशीनद्वारे केले जाते.

हि पोळी कर्वे रोड, भारती निवास कॉलनी एरंडवने पुणे येथे मिळेल.