कोणत्या दिवशी नखं काढणं अशुभ मानलं जातं?

शास्त्रात नखं कापण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत, आठवड्याच्या काही दिवशी नखे कापलीत तर अडचणी वाढू शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री कधीही नखे कापू नयेत, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.

मंगळवारी नखे कापणे वर्ज्य आहे, या दिवशी नखे कापल्याने कर्ज वाढते. आणि आर्थिक परिस्थिती बिघडते.

गुरुवारी नखे कापल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

शनिवारी नखे कापल्याने शनिदेवाचा कोप होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.

रविवारी नखे कापल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते. 

बुधवारी नखे कापल्याने संपत्तीत वाढ होते. यशाचे मार्ग खुले होतात.

शुक्रवारी नखे कापल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. जीवनात संपत्ती वाढते.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.