ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

4 सप्टेंबरला शुक्र ग्रह कर्क राशीत करणार प्रवेश. तर, बुध ग्रह 16 सप्टेंबरला जाणार सिंह राशीत.

वृषभ : आपलं आयुष्य सुख-सुविधांनी उजळून निघेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

धनू : आपलं नशीब आपल्याला पुरेपूर साथ देईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत, वैवाहिक जीवनात सकारात्मक वातावरण असेल.

कर्क : आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो, आपली आर्थिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक : आपली सर्व थकलेली कामं सुरळीत होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल.

मिथुन : आपली आर्थिक स्थिती सुधारेल. प्रयत्नांना यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

तूळ : आपल्याला मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत निर्माण होतील.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.