मिथुन राशीसाठी कसा आहे सप्टेंबर?
ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर महिना सुरु झाला आहे.
सप्टेंबर महिना मिथुन राशीच्या मंडळींसाठी कसा असेल?
याबाबत मुंबईतील ज्योतिष अभ्यासक पूजा बोटले यांनी माहिती दिली आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप शुभ आहे. बुध हा स्वतःच्या घरात असून रवी हा सोबत आहे.
त्यामुळे प्रवासाची संधी आहे. मात्र प्रवास करताना काळजी घ्यावी.
कुटुंबात आधीच सुरू असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे.
नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे.
संपत्तीत वाढ होण्याच्या शक्यतेने, लोक बचत करण्याच्या स्थितीत देखील असू शकतात.
हा महिना तुम्हाला खूप चांगले आरोग्य देईल, असे बोटले सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)