या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी लागणार?

ग्रहण ही वैज्ञानिक दृष्टीकोनातून खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी झाले. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी होत आहे.

हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 08.34 ते मध्यरात्री 02:25 पर्यंत असेल.

हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.

सूर्यग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे त्याचा सूतक कालावधी वैध राहणार नाही.

मुख्यतः सूर्यग्रहण अँटिग्वा, कॅनडा, ब्राझील, जमैका, अमेरिका, कोलंबिया इत्यादी देशांमधून दिसेल.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.

सूर्यग्रहणामुळे काही राशींवर त्याचा अशुभ प्रभाव दिसून येईल.

ग्रहण काळात मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.