'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा!  पाहा अहवाल आठवड्याचा

संकष्टी चतुर्थी,  कृष्ण जन्माष्टमीमुळे सप्टेंबरचा पहिला आठवडा आहे खास.

ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा ठरेल 5 राशींसाठी सकारात्मक.

वृषभ, सिंह, कन्या, मकर, कुंभ या राशींच्या व्यक्तींचं उजळणार नशीब.

वृषभ : ठरवलेली कामं होतील पूर्ण. गुंतवणूकीसाठी आहे योग्य काळ, मिळू शकतो चांगला नफा.

सिंह : पूर्वीच्या नुकसानाची मिळणार भरपाई. व्यवसायात होणार आर्थिक लाभ. आजारपणातून मिळणार सुटका. अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या : खावंसं वाटेल काहीतरी छान पण जरा जपून, होऊ शकतो मधुमेहाचा त्रास. नव्या खरेदीपूर्वी करा विचार, जुन्या वस्तूंचा होऊद्या पुरेपूर वापर.

मकर : भाग्य चांगली साथ देईल. प्रेमसंबंधांत गोडवा येईल. पार्टनरसोबत छान प्रवास होईल. सर्वत्र अगदी प्रसन्नता असेल.

कुंभ : व्यवसायात धनलाभाची शक्यता. नोकरीत वरिष्ठांकडून होईल प्रशंसा. कर्जाची करू शकाल परतफेड. उत्पन्न अधिक आणि खर्च कमी अशी राहील परिस्थिती.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)