हरियाणातील 'या' दोन नद्या ज्यामधे मिळतं सोनं

हरियाणातील यमुनानगर जिल्हा हा राज्यातील सर्वात हिरवा आणि थंड क्षेत्र मानला जातो.

त्या भागात वाहणाऱ्या 2 पावसाळी नद्या जाणू काही सोन्याचा वर्षावच करतात

हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ते अगदी खरे आहे.

यमुनानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या पाथराळा आणि सोम नद्यांमधून सोन येतं

या नद्यांमधून शेकडो लोक सोने काढतात आणि सरकारला महसूल मिळवून देतात.

त्याचबरोबर लोकही या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत.

हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगांच्या कुशीतून बाहेर पडलेल्या पाथराला आणि सोम नावाच्या दोन नद्या आपल्यासोबत सोनं वाहून आणतात असं म्हटलं जातं

या पावसाळी नद्या आहेत आणि जेव्हा डोंगरात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा या दोन नद्यांचे पाणी यमुनेला मिळते.

या नद्या आपल्यासोबत सोन्याचे सूक्ष्म कणही घेऊन जातात, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही